आले /अद्रक कंद सड काआरणे आणि उपाय

      नमस्कार मित्रांनो, या वर्षी आले पिकात मुळकुज ,कंद सड मोठया प्रमाणात समस्या भेडसावत आहे 

तर वेळ न गमवता आपण या विषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करू                                                           

1)महत्वाचा मुद्दा म्हणजे आले पिकात सड का लागते 

 1)अयोग्य बेणे

2)बेणेप्रक्रिया न करने किवा योग्य पद्धतीने न करने 

3)पिकाची फेरपालट न करने 

4)जमिनीत हानिकारक बुरशींची वाढ जास्त होणे

5)जमीन उन्हाळ्यात तापू न देणे

6) पाण्याचा निचरा न होणे 

अशी बरीच कारणे आहेत 

 2)आता पाहूया सड कोणकोणत्या बुरशी मुळे होते 

पिठीयम व फुजारियम या बुरशीमुळे ,तसेच सूत्रकृमी आणि कंदमाशी 

यांचा मुळे आले पिकात सड लागते 

3)आले पिकातील सड वर कसे  नियंत्रण  मिळवायचे 

1) रासायनिक नियंत्रण 

Metalaxyl 35% 

Roko

Blu copper

Elieate

Ridomil gold

या पैकी एक बुरशिनाशक आणि हुमिक अॅसिड यांची आळवणी तसेच दृचिंग 

करणे  दर 15 दिवसांनी

तसेच ऊंनी ,आळी,ईतर किडींनी कंदाला ईजा झालेली असेल तर क्लोरो पाइरिफोस किवा एवेरगोल्ड

,थियोमेथोजोमयापैकी एक किटक नाशक बुरशीनाशकसोबत घ्यावे 

सुतकृमी साठी velum prim चा 45 व 90 व्या दिवशी वापर करावा 

2)जैविक नियंत्रण 

trico,सुडो  एकरी 2 किलो  दर 10 दिसांनी सोडावे 

सूत्रकृमि साठी pacillomicin,biomix चा वापर ड्रिपने 45 व 90 व्या दिवशी करावा   


 तर शेतकरी मित्रांनो अशाप्रकारे आपण आले पिकातील सड वर नियंत्रण मिळवू शकतो 

सड वर 100% नियंत्रण मिळणारे औषद अजून बनले नाही त्यामुळे आपण आपल्या

पिकाचे चांगले नियोजन करूनच या वर मत करू शकतो म्हणून आपण आपल्या 

पिकाचे अशाप्रकारे नियोजन करून पहावे तसेच अनेक शेतकरी सड आल्या नंतर पिकाचे एनएनजेकेएल,,..एलजे,.

मित्रांनो आपला पिकाचा काही भाग खराब होणार आहे परंतु बाकीच्या भागात आपले पीक कसे चांगले येईल यावर ही आपण लक्ष द्यायला पाहिजे  धन्यवाद ! 

( टीप वरील नियोजन मी माझा शेतात वापरत आहे परंतु जमीन ,पाणी,रोग यानुसार आपण स्थानिक कृषि सेवा केंद्राचा सल्ला आवश्य घ्यावा )मिञांनो ही माहिती व्हिडिओ मध्ये पहायला आवडत असल्यास आपल्या Youtube channel 

ला नक्की सबक्राईब करा येथे नियमित शेती विषयक माहिती दिली जाते 🙏